Sunday 16 March 2014

होळीविषयक थोडेसे

होळीचा सण जेव्हा सुरू झाला त्यावेळी निश्चितच घनदाट वने होती. अशावेळी झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून वणवा पेटायचा. अशावेळी ते एक झाड तोडणे म्हणजे आजूबाजूच्या झाडांना वाचविणे होते. पण हे परंपरावादी लक्षात घेत नाहीत की अंधश्रद्धा निर्मुलक. ते म्हणतात झाडे तोडू नका तर हे म्हणतात इतरवेळचे काय? पण आधीच विकासाच्या नावाखाली एवढी जंगलतोड होत असताना, प्रदूषण वाढत असताना झाडे नष्ट करून होळी साजरी करणे हा कोणता शहाणपणा? आणि जे म्हणतात होळीसाठी वृक्षतोड करू नका ते कोणत्या प्रकारची झाडे लावतात हेही त्यांनी सांगावे(वड, पिंपळ यासारखी की अकेसिया सारखी?केवळ हिंदुंचा सण आहे म्हणून विरोध नको.) होळी साजरीच करायची असेल तर झाडाच्या काही फांद्या तोडूनही साजरी करता येईल त्यासाठी अख्ख झाड तोडण्याची काहीच गरज नाही. होळीत दारू पिऊन धिंगाणा घालणे हाही काही धर्म नव्हे(मी आजपर्यन्त कधीही कोणाला रंगविले नाही की वृक्षतोड करून होळी पेटविली नाही.)
अनिसविषयी थोडेसे
अनिसवाले अनेकवेळा सांगतात की व्रतासाठी झाडाच्या फांद्या तोडू नका. पण असं सांगणाऱ्या मुर्खाना हे माहित नाहीये की झाडाच्या काही फांद्या कापल्या तर अधिक जोमाने फांद्या येतात(मी काजुंचे जंगल व बाग यामध्ये राहतो त्यामुळे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे).
आजच्याकरीता एवढेच.
जय हिंद, जय भारत(जयतु जयतु हिंदू राष्ट्रं)!

No comments:

Post a Comment