Sunday 16 March 2014

होळीविषयक थोडेसे

होळीचा सण जेव्हा सुरू झाला त्यावेळी निश्चितच घनदाट वने होती. अशावेळी झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून वणवा पेटायचा. अशावेळी ते एक झाड तोडणे म्हणजे आजूबाजूच्या झाडांना वाचविणे होते. पण हे परंपरावादी लक्षात घेत नाहीत की अंधश्रद्धा निर्मुलक. ते म्हणतात झाडे तोडू नका तर हे म्हणतात इतरवेळचे काय? पण आधीच विकासाच्या नावाखाली एवढी जंगलतोड होत असताना, प्रदूषण वाढत असताना झाडे नष्ट करून होळी साजरी करणे हा कोणता शहाणपणा? आणि जे म्हणतात होळीसाठी वृक्षतोड करू नका ते कोणत्या प्रकारची झाडे लावतात हेही त्यांनी सांगावे(वड, पिंपळ यासारखी की अकेसिया सारखी?केवळ हिंदुंचा सण आहे म्हणून विरोध नको.) होळी साजरीच करायची असेल तर झाडाच्या काही फांद्या तोडूनही साजरी करता येईल त्यासाठी अख्ख झाड तोडण्याची काहीच गरज नाही. होळीत दारू पिऊन धिंगाणा घालणे हाही काही धर्म नव्हे(मी आजपर्यन्त कधीही कोणाला रंगविले नाही की वृक्षतोड करून होळी पेटविली नाही.)
अनिसविषयी थोडेसे
अनिसवाले अनेकवेळा सांगतात की व्रतासाठी झाडाच्या फांद्या तोडू नका. पण असं सांगणाऱ्या मुर्खाना हे माहित नाहीये की झाडाच्या काही फांद्या कापल्या तर अधिक जोमाने फांद्या येतात(मी काजुंचे जंगल व बाग यामध्ये राहतो त्यामुळे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे).
आजच्याकरीता एवढेच.
जय हिंद, जय भारत(जयतु जयतु हिंदू राष्ट्रं)!

Wednesday 12 March 2014

Fuzzy Logic in Bhagvata

The avtara of Nrusinha is good example of fuzzy logic. Brahma kept fuzzy logic in mind. So he devote Hiranyakashyapu as his wish.

गरज स्त्रीशक्ती जागृतीची

केवळ स्त्रियाच अबला नसतात. तर अनेक पुरुषही अबला असतात. परंतु मध्य युगात अबला म्हणजे स्त्री असा हेतुपुरस्कर गैरसमज पसरविण्यात आला. तरी जिजामाता, राणी चन्नम्मा, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक शूर स्त्रीया त्याही काळात झाल्या.
मान्य आहे स्त्रीया शारिरीकदृष्टया काहीशा कमजोर असू शकतात. पण मानसिकदृष्टया त्या कणखर असतात असे science सांगते. स्त्रीया आदरणीय राहाव्यात, संरक्षित राहाव्यात म्हणून त्यांवर काही बंधने आणली गेली. पण समाज त्याचा गैरवापर करत आहे व कुठेतरी तूच सांभाळून राहा. प्रत्येक पुरुष हा असाच असणार असे मनावर बिंबवत आहे. धर्माच्या नावावर स्त्रीशक्तीला कमजोर बनवत आहे.
पतिव्रता हा स्त्रीचा धर्म आहे हे मला मान्य आहे पण जर पती व्रती असेल तरच. अधर्मी दुराचार्याची पत्नी जर पतिव्रता बनली तरी शेवटी राष्ट्राचे नुकसानच होते(पतिव्रता म्हणजे पतीसेवा हेच व्रत व पती हाच परमेश्वर असे मानणारी. तीच्या लैंगीक वर्तनाशी मी पातिव्रत्याचा संबंध लावत नाही) तर पतीच्या हितासाठी, कुलाच्या हितासाठी शील पणाला लावणारी अनसूया सर्वाधीक पतिव्रता ठरते.
मूळ मुद्दा असा आहे आजच्या काळात स्त्री केवळ पतिव्रता असून चालणार नाही. किंबहुना ती पतिव्रता असण्यापेक्षा राष्ट्रासाठी, धर्मशील निर्व्यसनी शाकाहारी समाज बनविण्यासाठी लढायची तयारी असलेली हवी. केवळ स्वसंरक्षणच नव्हे, समाजातील राक्षसांचा, राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी दुर्गावतार, चंडीअवतार धारण करणारी हवी.

Monday 10 March 2014

स्वजातीला प्राधान्य द्या.

मी कर्माने नसलो तरी जन्माने कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण आहे. आणि माझ्या जातीची मला अजिबात लाज वाटत नाही. उलट मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याने मला निदान मांसाहार न करणाऱ्या घराण्यात जन्म दिलान.(पुढला जन्म मला गरीब का होईना पण गुजराथी/मारवाडी(राजस्थानी) शाकाहारीच घराण्यात मिळावा अशी इच्छा आहे.)
असो आता मुद्याकडे वळतो. आजकाल मुलींमध्ये एक fad आलंय ते म्हणजे इतरजातीय मुलाशी लग्न करण्याचं. ह्या मुली(किंवा आईबाप)  एखाद्या गरीब ब्राम्हण मुलाला नाकारतात पण ह्याच मुली अतिशय खालच्या स्तराला काम करणाऱ्या इतरजातीय मुलाशी लग्न करतात.(माझी सख्खी बहीणही यामध्ये आहे.) मी म्हणतो जन्माने नाहीतरी निदान कर्माने(ज्ञानाधारित व फक्त शाकाहारी) तुमच्या जातीचा आदर करणाऱ्या मुलाशी लग्न करा.(जन्मब्राम्हनापेक्षा कर्माला प्राधान्य द्यावे)एवढी चांगली मुले असताना याना घाणीत जाण्याची एवढी हौस का याचं कारण शोधताना मला एक प्रमुख कारण सापडलं ते म्हणजे चित्रपट व देवयानी सारख्या मालिका व तथाकथित ब्राह्मण समाजाची झालेली संकुचित मानसिकता. कारण एखादी मुलगी चुकली किंवा तशी तिच्यावर सक्ती करण्यात आली तर तिचे शुद्धीकरण करून तिला नव्याने सुरवात करायला उत्तेजन देण्याची अजूनही आपली मानसिकता नाही. उलट जबरदस्तीने का होईना तीने गेलेल्या घरासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करावा म्हणजे ती धन्य होईल असा असलेला समज.
आता थोडे देवयानीविषयी. पुराणात जी देवयानी आहे ती शुक्राचार्यांची(राक्षसांचे गुरू) मुलगी. तीला कचाचा शाप असतो की तीचे ब्राम्हण मुलाशी लग्न होणार नाही. आणि तीच ययातीला पती म्हणून स्वीकारते( मालिकेतील सम्राट सारखा ययाती तिच्यावर सक्ती करत नाही ). तरी तुरळक अपवाद(बालक-पालक, उंच माझा झोका) वगळता चित्रपट/मालिका बनविणारे समाजाचे प्रबोधन करण्यापेक्षा लोकांना वेडे बनवून पैसा कमावण्यात धन्यता मानतात. त्यामुळे निदान जन्मब्राम्हनानी तरी या चित्रपट/मालिकांवर बहिष्कार करून कर्मब्राम्हण होण्याच्या दिशेने पाऊल टाकावं ही विनंती.

Saturday 8 March 2014

खरे संत कोण?(साईबाबा, mother तेरेसा की राजीव दिक्षित?)

मांसाहार करणारे साईबाबा, mother तेरेसा जर संत असतील तर राजीवजीना का संत म्हणू नये? त्यांनी लग्न केलं नाही, धनसंचय केला नाही, प्रसिद्धीपरान्द्ग्मुख राहून राष्ट्रीयतेचा प्रसार केला. ते कदाचित खोटे बोलले असतील पण धर्मासाठी, राष्ट्रासाठी खोटे बोलणे माफ करायलाच हवं. आणि मला खात्री आहे की साईबाबा, mother तेरेसाही नक्कीच कधीना कधी खोटे बोलले असणार. पण राजीवजी विद्वान होते. त्यांनी IIT मधून B. Tech केलं आणि मुख्य म्हणजे तर्क, अनुभवाच्या (माझ्या) कसोटीवर त्यांची व्याख्याने खरी ठरतात.
मी साईबाबा, mother तेरेसा यांना देव किंवा संत तर मानत नाहीच शिवाय सत्पुरुष किंवा सद्स्त्रीही मानत नाही. मी अंधविश्वासू आहे. पण आता superstatius राहिलो नाही.

गुरुकुल शिक्षण पद्धती(माकॅल्ले(macalay) आणि कॉन्वेंट(convent) पेक्षा खूपच सरस)

 गुरुकुल शिक्षण पद्धती हीच खरी भारतीय शिक्षण पद्धती आहे ज्यामधे राजाचा मुलगा असो की गरीबाचा, सर्वांना एकत्रीत शिक्षण दिले जायचे. यात केवळ पाठांतरच नसे तर प्रत्यक्ष(प्रक्टिकल) शिक्षण(उदा. धनुर्विद्या, अस्त्रविद्या, कृषिविद्या) यांचाही समावेश होता. अध्यात्म हे तर उर्जाशास्त्र(energetics) आहे.
 परंतु परकीय आक्रमकांनी विशेषत: इंग्रजांनी ही शिक्षण पद्धती नष्ट केली आणि माकॅल्ले(macalay)ने अशी शिक्षण(?)पद्धती(?) निर्माण केली. ज्यामुळे भारतीय अनुवांशिकतेने भारतीय असतील पण विचाराने इंग्रज असतील. जी अजूनही चालू आहे.
 कॉन्वेंट(convent) ही युरोपमध्ये आईबापांनी फेकलेल्या मुलांसाठी असलेली शिक्षण पद्धती. आपण मात्र(मी नाही) कॉन्वेंट(convent)मधे मुलांना पाठविणे प्रतीष्टीचे समजतो.(जर कधी तशी वेळ आलीच(म्हणजे मी बाप झालोच) तर कॉन्वेंट(convent)मधे माझ्या मु(ला/ली)ला पाठविण्यास सक्तः विरोध असेल.)

मानवीय आहार:- फक्त्त शाकाहार

मांसाहाराचे अनेक तोटे आहेत. मांसाहारामुळे माणसाची मानसीकता बदलते. अनेक व्याधींचे कारण अति मांसाहार आहे.काही वैद्य(physian) लोक प्रथिने व जीवनसत्वे यासाठी मांसाहाराची शिफारस करतात. पण ते शाकाहारातूनही मिळतात. हत्ती, घोडे हे प्राणी शाकाहारी आहेत जे सर्वात शक्तिशाली आहेत. खरेतर पशुपक्ष्यांची हत्त्या करून त्यांची प्रेते आपल्या पोटात पुरणे हा नैतिक दृष्ट्या निसर्गाचा मोठा गुन्हा आहे कारण निसर्गाने आपले शरीराला उपयुक्त असा शाकाहार दिला आहे. तसेच आपण दूध वगैरे पिऊ शकतो जे गाईना, म्हशीना असतं जे त्यांच्या वासरांना पिण्यासाठी पुरूतच. व त्याहूनही जास्त असतं. मांसाहार हा अतिशय क्रूरतेने केला जातो जे हिटलरलाही पटल नाही म्हणून तो शाकाहारी होता.

प्रेम की आकर्षण?

चित्रपटांमुळे सर्वात बदनाम झालेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे प्रेम. चित्रपटातील नायक नायिकेतील प्रणय प्रसंग पाहून तरुणतरुणी आकर्षणालाच प्रेम समजतात आणि अनेकवेळा चुका करतात. मग कसेतरी नाते निभावतात. तर काही वेळा प्रेमाच्या नावाखाली मुलीना ठार मारण्याचे, विद्रूप करण्याचे प्रकारही होतात. पण खऱ्या प्रेमात आपण समोरच्या सुखात सुख व दु:खात दु:ख मानतो व तिला/त्याला काय आवडते याचा विचार करतो.
तरुण वयात भिन्न लैंगिक व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. व या आकर्षणातून प्रेमही निर्माण होते. परंतु आकर्षणाला प्रेम समजणे सर्वथा चुकीचे आहे. व जीच्यावर प्रेम(?) आहे अशा व्यक्तीला त्रास होईल असे वागणे हा गुन्हा आहे. पण काही वेळा असेही घडते की आपल्याला तिला त्रास द्यायचा नसतो पण तीचा मात्र गैरसमज झालेला असतो. अशावेळी तीला कसं पटवून द्यावं की माझ मन तिच्याकडे ओढ घेतंय, पण मला तीला t  हा मला पडलेला प्रश्न आहे.

Monday 3 March 2014

मूर्तिपूजा का करावी?

अनेकजण मूर्तीपूजा करतात ते देवाने आपल्या आकांक्षा पूर्ण कराव्यात. त्यांची देव म्हणजे दुसऱ्या ग्रहावर किंवा आकाशात काहीतरी आहे अशी काहीतरी समजूत असते.केवळ मूर्तीला वाहिले तर ते त्यापर्यंत पोहोचेल असा गोड गैरसमज असतो. हे सर्व काहीजणांना न पटल्याने ते मूर्तीपूजा करीत नाहीत.
खरेतर देव,परमेश्वर, परमात्मा, भगवान ही भिन्नभिन्न तत्वे आहेत. वेगवेगळ्या देवता म्हणजे वेगवेगळी तत्वे आहेत. ह्या तत्वांना समजून त्यांची कृपाप्रप्ती होण्यासाठी मूर्तिपूजा केली पाहिजे. आपल्या कर्तृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे अदृश्य शक्तींचा आधार घेण्यासाठी मूर्तीपूजा जरूर करावी. परंतु परमात्म्याला त्या मूर्तीत सीमित समजू नये. सर्व जीवजंतू सुखी राहावेत अशी इच्छा करणे हाच खरा परमार्थ!मूर्तीवर उगाच उपचारांचे ओझे करू नये असे मला वाटते.