Monday 10 March 2014

स्वजातीला प्राधान्य द्या.

मी कर्माने नसलो तरी जन्माने कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण आहे. आणि माझ्या जातीची मला अजिबात लाज वाटत नाही. उलट मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याने मला निदान मांसाहार न करणाऱ्या घराण्यात जन्म दिलान.(पुढला जन्म मला गरीब का होईना पण गुजराथी/मारवाडी(राजस्थानी) शाकाहारीच घराण्यात मिळावा अशी इच्छा आहे.)
असो आता मुद्याकडे वळतो. आजकाल मुलींमध्ये एक fad आलंय ते म्हणजे इतरजातीय मुलाशी लग्न करण्याचं. ह्या मुली(किंवा आईबाप)  एखाद्या गरीब ब्राम्हण मुलाला नाकारतात पण ह्याच मुली अतिशय खालच्या स्तराला काम करणाऱ्या इतरजातीय मुलाशी लग्न करतात.(माझी सख्खी बहीणही यामध्ये आहे.) मी म्हणतो जन्माने नाहीतरी निदान कर्माने(ज्ञानाधारित व फक्त शाकाहारी) तुमच्या जातीचा आदर करणाऱ्या मुलाशी लग्न करा.(जन्मब्राम्हनापेक्षा कर्माला प्राधान्य द्यावे)एवढी चांगली मुले असताना याना घाणीत जाण्याची एवढी हौस का याचं कारण शोधताना मला एक प्रमुख कारण सापडलं ते म्हणजे चित्रपट व देवयानी सारख्या मालिका व तथाकथित ब्राह्मण समाजाची झालेली संकुचित मानसिकता. कारण एखादी मुलगी चुकली किंवा तशी तिच्यावर सक्ती करण्यात आली तर तिचे शुद्धीकरण करून तिला नव्याने सुरवात करायला उत्तेजन देण्याची अजूनही आपली मानसिकता नाही. उलट जबरदस्तीने का होईना तीने गेलेल्या घरासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करावा म्हणजे ती धन्य होईल असा असलेला समज.
आता थोडे देवयानीविषयी. पुराणात जी देवयानी आहे ती शुक्राचार्यांची(राक्षसांचे गुरू) मुलगी. तीला कचाचा शाप असतो की तीचे ब्राम्हण मुलाशी लग्न होणार नाही. आणि तीच ययातीला पती म्हणून स्वीकारते( मालिकेतील सम्राट सारखा ययाती तिच्यावर सक्ती करत नाही ). तरी तुरळक अपवाद(बालक-पालक, उंच माझा झोका) वगळता चित्रपट/मालिका बनविणारे समाजाचे प्रबोधन करण्यापेक्षा लोकांना वेडे बनवून पैसा कमावण्यात धन्यता मानतात. त्यामुळे निदान जन्मब्राम्हनानी तरी या चित्रपट/मालिकांवर बहिष्कार करून कर्मब्राम्हण होण्याच्या दिशेने पाऊल टाकावं ही विनंती.

No comments:

Post a Comment