Monday 3 March 2014

मूर्तिपूजा का करावी?

अनेकजण मूर्तीपूजा करतात ते देवाने आपल्या आकांक्षा पूर्ण कराव्यात. त्यांची देव म्हणजे दुसऱ्या ग्रहावर किंवा आकाशात काहीतरी आहे अशी काहीतरी समजूत असते.केवळ मूर्तीला वाहिले तर ते त्यापर्यंत पोहोचेल असा गोड गैरसमज असतो. हे सर्व काहीजणांना न पटल्याने ते मूर्तीपूजा करीत नाहीत.
खरेतर देव,परमेश्वर, परमात्मा, भगवान ही भिन्नभिन्न तत्वे आहेत. वेगवेगळ्या देवता म्हणजे वेगवेगळी तत्वे आहेत. ह्या तत्वांना समजून त्यांची कृपाप्रप्ती होण्यासाठी मूर्तिपूजा केली पाहिजे. आपल्या कर्तृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे अदृश्य शक्तींचा आधार घेण्यासाठी मूर्तीपूजा जरूर करावी. परंतु परमात्म्याला त्या मूर्तीत सीमित समजू नये. सर्व जीवजंतू सुखी राहावेत अशी इच्छा करणे हाच खरा परमार्थ!मूर्तीवर उगाच उपचारांचे ओझे करू नये असे मला वाटते.

No comments:

Post a Comment