Saturday 15 February 2014

बालक पालक आणि वस्तुस्थिती!

आपल्या संस्कृतीने चार पुरुषार्थ निर्धारित केले आहेत ते म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष. याचाच अर्थ ऐहिक सुख(काम) प्राप्त  करणे हाही आपला धर्म आहे. ऐहिक सुखापैकी एक महत्वाचे असते ते म्हणजे लैंगीक सुख. पण कोणतेही सुख निकोपीरित्या  उपभोगण्यासाठी संयमाची आवश्यकता असते म्हणून कोणते सुख कसे घ्यावे याचे निर्बंधही संस्कुतीने घालून दिले आहेत याबद्दल वाचकांचे दुमत नसावे.
परंतु काही निर्बंध आहेत याचा अर्थ ते सुख घेणे वाईट आहे असा होत नाही. परंतु कालौघात धार्मिक ग्रंथात बदल घडविण्यात आले. तसेच परकीयांनी भारतीय समाज पौरुशहीन व्ह्वावा म्हणून काही समाजात अपसमज पसरविले त्यापैकी लैंगीक सुख हे अतिशय हिणकस सुख आहे. आपणही ते खरे मानले त्यामुळेच त्याची माहिती घेणे, देणे हेही तथाकथित सुसंकृत धार्मिक लोकांना पाप वाटू लागले. परंतु लैंगीक सुखाची इच्छा नैसर्गिक असल्यामुळे ती सजीव असेपर्यंत राहणारच.परंतु हे मान्य करणे आपणास अवघड लागले त्यामूळे मुलामुलींमध्ये वय होताच ह्या भावना तर जागृत होत होत्याच पण पूर्वी एवढी साधने नव्हती. परंतु नवीन तंत्राबरोबर ही माहिती मिळवणे सुकर झाले. आणि ती तशी घेऊही लागले जो बालकपालकचा विषय आहे. अशावेळी पालकांनी सावध होऊन आपली मुले/मुली चुकीची वाट पकडून ही माहिती मिळवणार नाहीत व त्यांना योग्य रीतीने ही माहिती कशी देता येईल यावर फार विचार करण्याची गरज आहे. बालकपालकचे सत्य नाकारल्यास नुकसान आपलच(आणि आपल्या मुलांचे) आहे हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपला मुलगा त्यातला नाही(मला फक्त मुलच माहिती आहेत/ मुलीही पाहतात असे केवळ ऐकलं आहे) अशा भ्रमात कोणीही राहू नये ही विनंती
थोडक्यात मी इतकेच म्हणेन लैंगिक इच्छा ही LPG सारखी असते योग्य प्रकारे न हाताळल्यास मोठा विध्वंस करू शकते.

2 comments: