Thursday 16 August 2018

कळी खुलली(लघुकथा)

(टीप: यातील पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. योगायोगानं सुद्धा यात साधर्म्य आढळणं जवळजवळ अशक्य आहे.)
"जळो मेला तो बायकांचा जन्म" पुटपुटतच अनिता आत शिरली. "काय झालं", निताबाईंनी विचारलं.  अनिता निताबाईंची थोरली मुलगी. नीताबाईंच्या दोन मुली, थोरली अनिता, धाकटी सुनीता. मुली झाल्या म्हणून निताबाईंचं किंवा अनिलरावांचं मन कधी खट्टू झालं नाही. एवढंच काय त्यानी सुनीताला कधी मुलाचे कपडे घातले नाहीत की घालू दिले नाहीत. त्या सांगत मुलगा नाही याची खन्तच जर नाही तर मुलीला मुलासारखं का वाढवायचं! पण अनिता थोडीशी बंडखोर, तिला स्त्री म्हणून सहन करावं हे पटायच नाही तर झालं असं होतं कुठल्यातरी मठात स्त्रियांना प्रवेश नव्हता याचा अनिताला राग आला होता. "हे बघ तू मठ वगैरे मानतेस का, त्यातील बुवा, बाबांवर तुझी श्रद्धा आहे का, नाही ना, मग उगाच कशाला थयथयाट करतेस" निताबाई म्हणाल्या.अनिताचा मठ, बुवांवर विश्वास नव्हता. "पण आई", अनिता म्हणाली. "आता पण नाही आणि बीण नाही", अनिताने पुढे काही बोलायच्या आतच निताबाई बोलू लागल्या,"आता तू काय म्हणणार ते मला माहिती आहे, तू हेच म्हणणार ज्यांना जायचं आहे त्याना काय, पण त्यांचं त्या बघून घेतील की, आता तू म्हणशील महिलांवर हा अन्याय आहे पण त्यालाही काही कारणं असतीलच तेव्हा आपण त्यात न पडलेलंच बरं! अगं वेडे मुळात आरोग्याच्या दृष्टीने काही नियम करण्यात आले पण नन्तरच्या मूर्ख पिढ्यानी त्याचा अतिरेक केला. रज वीर्य संयोगशिवाय तो स्वामी जन्मला असेल का, त्यालाही आई असेलच की! आईचं प्रेम त्यालाही असणारच. तरीही त्यानं असे असे नियम बनविले कारण त्याचा स्वतः च्या संयमनशक्तीवर विश्वास नाही त्यावेळी आपण अशा गोष्टींसाठी डोक्यात राख घालून घेऊ नये. अगं शेवटी स्त्रीच तर आई होऊ शकते. नर किंवा पुरुष नाही". अनिताला निताबाईंचं म्हणणं पटलं आणि तीची कळी खुलली.

No comments:

Post a Comment