Thursday, 16 August 2018

अंतिम इच्छा

(टीप:यातील पात्रे, घटना,स्थळे काल्पनिक आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध आढळल्यास लेखकाला दैवी देणगी आहे असं समजावं)
"माझ्याशी लग्न करशील काय", अनिताने विचारलं. सुमीतचा आपल्या कानावर विश्वास बसेना.तशी अनिता त्यालाही आवडत होती पण त्याला धैर्य होत नव्हतं. अनिता असं विचारील असं त्याला वाटलही नव्हतं. पुन्हा प्रश्न आला "अरे काय म्हणतीय मी?" "सांगतो", सुमित एवढच म्हणाला. खरंतर त्याला होकारच द्यायचा होता.पण तो अजून धक्क्यातून सावरला नव्हता.
अनिता तशी साधी सरळ स्त्री, हेमंतशी लग्न झाल्यापासून  तीनं घरसंसार सुरळीतपणे चालवलं होतं. स्वतः मास्टरऑफ सायन्स इन इन्फॉर्मशन टेक्नॉंलॉजी असूनही तीनं घरसंसार याला प्राधान्य दिलं होतं. हेमंतही तसा हुशार, त्याचं तर्कशास्त्र चांगलं होतं पण मनायाच्या(मीलन) नादी लागला आणि पुरती वाट लागली. अगोदर अंडं असतं म्हणून केक न खाणाऱ्या या पठ्यानं बीफ खायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. अनिताने मुलाकडे आणि सासुकडे बघून बराच काळ सहन केलं पण सहनशीलतेलाही मर्यादा असते, स्त्री मारझोड सहन करते पण सवत सहन करणं तिच्यासाठी अवघड असतं. तरीपण तीनं ते केलं होतं अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा तीनं काडीमोड घेतला.
या सगळ्यात तीला खंबीर साथ दिली सुमितनं, खरंतर तो हेमंतचा अस्थापनातील सहचारी(कलीग) आणि एकवेळचा जिवाभावाचा मित्र. कोकणातील एका खेड्यातून मुंबईत गेलेला. पण मनाया प्रकरणापासून त्यांच्यातील दूरी वाढत गेली आणि अनिताबद्दल त्याच्या मनात प्रथम सहानभूती आणि नंतर प्रेम(आकर्षण) निर्माण झालं पण ती कशी प्रतिक्रियांवित होईल म्हणून तो गप्प होता. शिवाय अनिताची सासू असणं हेही एक कारण होतं कारण अनिताची सासू साधी, सरळ असली तरी तिला हे रुचणं त्याला कठीण वाटत होतं. हल्लीच तिचं निधन झालं होतं, सुमितनंच तीची अंत्येष्टी केली होती कारण तिचीच तशी इच्छा होती.
दुसरे दिवशी सुमित अनिताला भेटला, म्हणाला "मीच तुला विचारणार होतो पण आईकडे(अनिताची सासू) बघून गप्प होतो. सुमितचे आईवडील लहानपणीच वारले होते. "अरे त्यानीच तर जाता जाता सांगितलं की त्यांची तशी इच्छा आहे म्हणून", " म्हणजे माझंपण मन तुझ्याकडे ओढ घेत होतं रे, आणि तुझंही घेतंय मला कळत होतं पण मी ही अशी म्हणून गप्प होते". "असं बोलायचं नाही", सुमीत म्हणाला, " हेमंत तसा झाला त्यात तुझा काय दोष!"
अखेर अंतिम इच्छा अशा रीतीनं पूर्ण झाली.

No comments:

Post a Comment