Saturday, 28 February 2026

परमात्मानुभव

शीर्षक जरी परमात्मानुभव दिलं असलं तरी एवढं मोठं जग आहे म्हणजे कुणी तरी त्याला निर्माता/ती असलं पाहिजे असले फालतू सिद्धांत(?) मांडण्याकरिता हे प्रेषण नाही. जे मानवी तर्क बुद्धीच्या 'पलिकडे' आहे त्याला तर्क बुद्धीनं कसं सिद्ध करणार!
डार्विनचा विकासवादाचा तथाकथित सिद्धांत मला नाकारायचा नाही. कारण जीवनाची उत्पत्ती कशी 'होते' याबद्दल वेद-पुराणातील मतांशी सुसंगत गृहीतकं आहेत ती! पण मला तुमच्या बुद्धीला थोडा ताण द्यायचा आहे. जरा विचार करा! समजून चलू काही पद्म वर्षांपूर्वी जीवन अस्तित्वात आलं, आणि काही लक्ष वर्षांनी ते संपेल. पण मग त्यापूर्वी आणि त्यानंतर काय! म्हणून आपलं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं ब्रह्म अनादी अनंत आहे. चार युगं आहेत आणि ती सतत पुनरावृत्त होत आहेत. यापेक्षा तर्क पूर्ण मत काय असू शकेल!
धन्यवाद!

Sunday, 22 February 2026

परमात्मविचार!

!मला वाटतं आत्मा, परमात्मा हे शब्द कुणी तरी गुजराथी चिंतकांनी दिले असावेत. आत मा(मध्ये) असतो तो आत्मा असा तो विचार असावा. असो. मला आता त्यावर जास्त बोलायचं नाही आहे.
तर आत्मा म्हणजे काय तर सर्वांमध्ये असणारं एक तत्त्व! परमात्मा म्हणजे समुच्चित आत्मा! त्याला ब्रह्म किंवा चैतन्यही म्हटलं जातं. आत्मा हे आंग्ल भाषेतील सौल(soul)हून भिन्न आहे. सौल केवळ हुमन बेइंगमधे असतं असं त्यांचं(अब्राह्मिकांचं) मत आहे. पण चैतन्य निर्जीव समजल्या जाणाऱ्या गोष्टींचाही असतं. ही त्याची विशेषता आहे. मलं-मूत्र, निर्जीव(?) शरीर यांमध्ये ही चैतन्य असतंच पण आपण नाव दिलेलं चैतन्य नसतं.
मला वाटतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद!