Tuesday, 25 February 2014

चित्रपट, मालिका व क्रिकेट, पायचेंडू यासारख्या खेळामूळे होणारी धर्महानी!


चित्रपट, TV यासारख्या साधनांची निर्मिती करण्यात आली तेच मुळी लोकांना विचार करण्यापासून थांबविण्यासाठी. Oh My God सारख्या तुरळक चित्रपटातून धर्म म्हणजे काय हे सांगितलय पण ते शेवटी. इतरवेळ फक्त्त सांप्रदायिक(मुस्लीम, ख्रिस्ती) व भारतीय वेशभूषा करणाऱ्यांची टर उडविण्यावर खर्च केलेला आहे. तरीपण धर्म म्हणजे काय हे कळण्यासाठी हा चित्रपट एकदा जरूर पाहावा(रामायण, महाभारत यासारख्या पुराणांवरील चित्रपट, मालिकांनी धर्म समजावण्यापेक्षा अंधविश्‍वास वाढवण्याचेच काम केलं). अनेक चित्रपटातून धर्मदास या नावाची अधर्मी व्यक्तिरेखा रंगवलीय. ठाकूर, मुनीम, बनिया यासारख्या शाकाहारी प्रजातींची प्रतिमा बदनाम केली गेली आहे. आंतरजातीय लग्ने करण्याचे प्रमाणही वाढलेय. बहुतांशी अभिनेते, अभिनेत्र्या अधर्मी आहेत. काही गुन्हेगारांना मदत करणारेही आहेत.
आता वळतोय क्रिकेटकडे. क्रिकेट एक खेळ म्हणून मलाही आवडतो. पण आधुनिक क्रिकेट हे सत्धर्माचे नुकसान करणारे आहे कारण क्रिकेट, पायचेंडूचे चेंडू गोचर्मापासून  बनविले जातात. मैदानेही अधर्माने तयार केली जातात. क्रिकेटसाठी लाकूड लागते म्हणजे वृक्षतोडही आलीच(एरवी स्वतःला पर्यावरणप्रेमी म्हणविणारे याची कधी दखल घेतील का?) बहुतांशी खेळाडूही अधर्मी आहेत व गुन्हेगारांना मदत करणारेही आहेत.
एकूण काय तर चित्रपट, मालिका(यामध्ये तथाकथित सत्यता प्रदर्शनही समन्वित आहे) व क्रिकेट, पायचेंडू पाहून आपण आपला पैसा, मौल्यवान वेळ वाया घालवतो व अधर्म्याना मदत करतो. हा वेळ आपण सामूहिक उपासना, ध्यानधारणा, सामूहिक धर्मचिंतन यासारख्या चांगल्या कार्यांसाठी वापरून ऐहिक सुख व पारमार्थिक समाधानही मिळवू शकतो. लक्ष देऊन वाचल्याबद्दल आभार!

विकास:-एकांगी की शाश्वतं?

पूर्वराष्ट्रपती सर्वपल्ली यांनी साम्यवादी रशियनन अध्यक्षांना केलेला प्रश्न मला आठवतोय, महाशय घोड्याप्रमाणे वेगाने जमिनीवर धावू शकता व आकाशात पक्षाप्रमाणे उडू शकता पण माणसाप्रमाणे वागायला शिकलात का? आपलीही विचारसरणी तशीच (रशियाच्या अध्याक्षांप्रमाणे) झालीय. मोठमोठे बंगले, गाड्या, गाड्गेत्स, राजमार्ग, विमानतळ झाले म्हणजे विकास झाला असा गैरसमज झालाय. त्याचवेळी आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपण यंत्रावलंबी व यंत्रवत झालो आहोत. केवळ ऐहिक सुख म्हणजे विकास असा जडवादी समाज आपण बनवितो आहोत. पण माणसाला केवळ ऐहिक सुख मिळून समाज सुखी होणार नाही. समाजामध्ये बौद्धिक व वैचारिक प्रगल्भता यावी लागते नाहीतर विकास हा एकांगी असतो व संपूर्ण समाजाला  सुखी करू शकत नाही. याचमुळे पाश्चात्य समाज अध्यात्माकडे व भारतीय शास्त्रांकडे वळत आहेत. लक्षपूर्वक वाचल्याबद्दल आभारी आहे. 

Saturday, 15 February 2014

बालक पालक आणि वस्तुस्थिती!

आपल्या संस्कृतीने चार पुरुषार्थ निर्धारित केले आहेत ते म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष. याचाच अर्थ ऐहिक सुख(काम) प्राप्त  करणे हाही आपला धर्म आहे. ऐहिक सुखापैकी एक महत्वाचे असते ते म्हणजे लैंगीक सुख. पण कोणतेही सुख निकोपीरित्या  उपभोगण्यासाठी संयमाची आवश्यकता असते म्हणून कोणते सुख कसे घ्यावे याचे निर्बंधही संस्कुतीने घालून दिले आहेत याबद्दल वाचकांचे दुमत नसावे.
परंतु काही निर्बंध आहेत याचा अर्थ ते सुख घेणे वाईट आहे असा होत नाही. परंतु कालौघात धार्मिक ग्रंथात बदल घडविण्यात आले. तसेच परकीयांनी भारतीय समाज पौरुशहीन व्ह्वावा म्हणून काही समाजात अपसमज पसरविले त्यापैकी लैंगीक सुख हे अतिशय हिणकस सुख आहे. आपणही ते खरे मानले त्यामुळेच त्याची माहिती घेणे, देणे हेही तथाकथित सुसंकृत धार्मिक लोकांना पाप वाटू लागले. परंतु लैंगीक सुखाची इच्छा नैसर्गिक असल्यामुळे ती सजीव असेपर्यंत राहणारच.परंतु हे मान्य करणे आपणास अवघड लागले त्यामूळे मुलामुलींमध्ये वय होताच ह्या भावना तर जागृत होत होत्याच पण पूर्वी एवढी साधने नव्हती. परंतु नवीन तंत्राबरोबर ही माहिती मिळवणे सुकर झाले. आणि ती तशी घेऊही लागले जो बालकपालकचा विषय आहे. अशावेळी पालकांनी सावध होऊन आपली मुले/मुली चुकीची वाट पकडून ही माहिती मिळवणार नाहीत व त्यांना योग्य रीतीने ही माहिती कशी देता येईल यावर फार विचार करण्याची गरज आहे. बालकपालकचे सत्य नाकारल्यास नुकसान आपलच(आणि आपल्या मुलांचे) आहे हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपला मुलगा त्यातला नाही(मला फक्त मुलच माहिती आहेत/ मुलीही पाहतात असे केवळ ऐकलं आहे) अशा भ्रमात कोणीही राहू नये ही विनंती
थोडक्यात मी इतकेच म्हणेन लैंगिक इच्छा ही LPG सारखी असते योग्य प्रकारे न हाताळल्यास मोठा विध्वंस करू शकते.